फनी चक्रीवादळ; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू
   दिनांक :13-May-2019
पुरी,
 
ओडिशामध्ये मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या फनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 3 मे रोजी ओडिशा येथे 240 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चक्रीवादळात जवळपास 241 जण जखमी झाले आहेत. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 वर होता तो वाढून आता 64 झाला आहे. पुरी जिल्ह्याशिवाय खुर्दा जिल्ह्यात 9 जण, कटक जिल्ह्यात 6, मयूरभंजमध्ये 4, केंद्रपाडा आणि जाजपुर येथे प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

 
 
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 1 हजार कोटींची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती. त्याचसोबत मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी फनी चक्रीवादळामुळे ज्या लोकांची घरे उद्धवस्त झाली आहेत अशा लोकांना पक्की घरे देण्याची घोषणा केली आहे.