ऋषी कपूर यांच्या भेटीला दीपिका
   दिनांक :13-May-2019
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या सात-आठ महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी आहेत. यादरम्यान बऱ्याच कलाकारांनी त्यांची तिथे भेट घेतली. अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. या भेटीनंतर नीतू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचा फोटो पोस्ट केला आहे.
 
 
‘दीपिकासोबत घालवलेली संध्याकाळ अत्यंत मजेशीर होती,’ या कॅप्शनसह नीतू कपूर यांनी फोटो पोस्ट केला. दीपिकाने ‘मेट गाला २०१९’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. हा सोहळा न्यूयॉर्कमध्येच पार पडला होता. त्यानंतर तिने या दोघांची भेट घेतली. ब्रेकअपनंतरही दीपिकाने रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. ऋषी कपूर यांची तिने घेतलेली भेट हे त्याचेच एक उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांचे मित्र आणि दिग्दर्शक राहुल रवैल यांनी ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं रणबीरनेही सांगितलं.