मोदींना एक मतही देऊ नका-ममता बॅनर्जी
   दिनांक :13-May-2019
 
नामखाना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विध्वंस केला असल्याने, ते पुन्हा पंतप्रधान होणार नाही, याची काळजी घ्या आणि मोदींना एक मतही देऊ नका, अशी याचना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
मागील पाच वर्षांच्या काळात मोदी यांच्या सरकारने देशासाठी काहीच केले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी 24 परगणा जिल्ह्यातील नामखाना येथे आयोजित निवडणूक सभेत सांगितले. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेत आहे, तुम्ही जर पुन्हा या चौकीदाराच्या हातात सत्ता सोपवली तर देश उद्‌ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मतदारांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, यासाठी आपले एकही मत त्यांना द्यायला नको, असे त्या म्हणाल्या.भाजपाने आदिवासी, अल्पसंख्यक आणि पत्रकारांवरही हल्ले करून, त्यांना ठार मारले आहे. भाजपाबद्दलची भीती मनातून काढून टाका. फक्त भाजपालाच नाही, तर माकप आणि कॉंगे्रसलाही आपले मत देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.