विमानाचा लँडिंग गिअर फेल, पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले 89 प्रवाशांचे जीव; व्हिडीओ व्हायरल
   दिनांक :13-May-2019
नवी दिल्ली,
म्यानमार विमानतळावर विमानाचा लँडिंग गिअर फेल झाल्याने इमर्जन्सीमध्ये दोन चाकांवर विमान रनवेवर उतरविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमानातील 89 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.
 

 
रविवारी यूबी 103 या विमानाचे म्यानमार येथील मंडाले एअरपोर्टवर सकाळी 9 च्या सुमारात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 7 कर्मचाऱ्यांसह एकूण 89 प्रवाशी प्रवास करत होते. या विमानाचा खतरनाक लँडिंग सध्या सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे विमानातील लँडिंग गिअर बॉक्स खराब झाला. म्यानमारचे सिव्हील एव्हिएशन विभागाचे डिप्टी डायरेक्टर जनरल यांनी सांगितले की, विमानातील पायलटने लँडिंगवेळी विमानातील लँडिंग गिअर सुरु करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही.
 
 
पहिल्यांदा त्याने कॉम्प्युटर सिस्टमने गिअर बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उघडला नाही म्हणून हाताने गिअर उघडण्याचा प्रयत्न केला त्यातही त्याला यश आलं नाही. त्यामुळे विमानाचे पुढचे चाक उघडले नाही. त्यानंतर मागच्या दोन चाकांवरच ही लँडिंग करण्यात आली. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पायलटच्या चाणाक्ष्य बुद्धीने आणि हिंमतीने अशाप्रकारे लँडिंग केलं गेलं अन्यथा असं लँडिंग करणे खूप धोकादायक असते यामध्ये प्रवाशांचा जीवालाही धोका असते.