इंग्लंडचा पाकिस्तानवर 12 धावांनी विजय

    दिनांक :13-May-2019
साऊथहॅम्पटन,
 
जॉस बटलरने 50 चेंडूमध्ये फटकावलेल्या नाबाद शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 12 धावांनी पराभव केला. इंग्लंडने निर्धारित 50 षटकांमध्ये 374 धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले होते. नाणेफेक िंजकल्यावर क्षेत्ररक्षण करण्याचा पाकिस्तानने घेतलेला निर्णय अंगलट आला. तडाखेबाज 110 धावांसाठी बटलरला सामनावीर घोषित करण्यात आले.
 
 
इंग्लंडचे सलामीवीर जे. जे. रॉय आणि जॉनी बेअरस्टोने 19 षटकांत 115 धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रॉयने 87, तर बेअरस्टोने 51 धावा काढल्या. तिसर्‍या क‘मांकावर उतरलेल्या जो रूटने 40 धावांचे योगदान दिले. मॉर्गनने कर्णधारपदाला साजेशी खेळी करीत नाबाद 71 धावा काढल्या.
 
पाचव्या क्रमांकावर आलेल्या जॉस बटलरने पाकिस्तानच्या गोलंदाजांना पुरते निष्प्रभ केले. त्याने 55 चेंडूमध्ये 9 षट्‌कार आणि 6 चौकारांच्या बळावर नाबाद 110 धावा काढत पाकिस्तानसमोर 374 धावांचे लक्ष्य समोर ठेवले.
 
पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. 92 धावांची भागीदारी झाली असताना इमाम-उल-हकच्या रूपात पहिला गडी बाद झाला. त्याने 35 धावा काढल्या. सलामीला आलेल्या फकर झमानने 138 धावा काढून इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणले होते. बाबर आझम आणि आसिफ अली यांनी अर्धशतक फटकावले. या व्यतिरिक्त कर्णधार सर्फराज अहमदने 41 धावा काढल्या. पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज मोठ्या लक्ष्याच्या दडपणात आल्याने हाणामारीच्या प्रयत्नात ते बाद झाले.