विषबाधेने ५ जनावरांचा मृत्यू
   दिनांक :13-May-2019
खरंगणा : नजीकच्या दहेगाव (गोंडी) येथे चराई करीत गेलेल्या २० गुरांना विषबाधा झाली. त्यापैकी १५ जनावरांना वाचवण्यात डॉक्टराना यश आले. ही घटना आज सोमवार १३ रोजी दुपारी २ वाजता घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, येथील शेतकरी राजू देशमुख याची २० जनावर खोब्रागडे यांचे शेतात चराई करीत गेली असता ज्वारीच्या मुळ्या खाल्ल्याने सर्व जनावर अत्यावथ झाल्याचे गुराख्याच्या लक्षात आले. त्याने देशमुख यांना माहिती दिली. देशमुख पशुधन पर्यवेक्षक किशोर तपासे याना घेऊन घटनास्थळी पोहोचले. औषोधोपचार केल्याने १५ जनावरांचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले, परंतू ५ जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे ७५ हजाराचे नुकसान झाले. घटनास्थळी काचनूर येथील पशुधन पर्यवेक्षक रोषणा डफ, मदतगार कमलेश डहाके यांनी पाहणी केली.