‘कबीर सिंग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :13-May-2019
अभिनेता शाहिद कपूर बहुचर्चित चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’मध्ये दिसणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.
 
 
 
या ट्रेलरमध्ये अर्जुन रेड्डीची मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब दिसत आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिद कियारा उर्फ प्रीतीच्या प्रेमात पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेल्या अँग्री यंग मॅन, कबीर सिंगची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता आणि आता ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
 
‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. आता या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.