धोनी खेळाडू नव्हे, क्रिकेटचे एक युगः हेडन

    दिनांक :13-May-2019
चेन्नई, 
महेंद्रिंसग धोनी केवळ खेळाडूच नव्हे, तर तो क्रिकेटचे युग आहे, असे गौरवोद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने काढले आहेत.
 
 
 
एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅथ्यू हेडनने धोनीबाबतचे मत व्यक्त केले आहे. धोनी फक्त खेळाडू नाही, क्रिकेटचे  एक युग आहे. धोनी हा गल्लीतील क्रिकेट संघाचा कर्णधार आहे, असे वाटते. तो आपल्यातीलच एक आहे, जो संघासाठी सर्वकाही करण्यास तयार असतो, असे हेडनने सांगितले. धोनी पूर्ण अभ्यास करून मैदानात उतरतो. फिरकी गोलंदाजांकडून हवी तशी गोलंदाजी करून घेतो आणि झेल घेतो. इतर खेळाडूंचा सल्ला घेतो आणि यानंतरही शांत असतो. त्याच्या सारखी व्यक्ती सोबत असेल, तर आपण निश्चिंत असतो, असे हेडनने सांगितले.
 
आयपीएलच्या 12 व्या मोसमात त्याने घातलेल्या धावांच्या रतिबावरून धोनीला चेन्नई सुपर किंग्जचा ‘थलाईवा’ उगीच म्हटले जात नाही. तो फक्त चेन्नई सुपर किंग्जचा नाही तर देशाचाही कर्णधार आहे, असेही त्याने सांगितले.