छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा आयईडी स्फोट; एक जवान जखमी
   दिनांक :13-May-2019
छत्तीसगड आणि ओडिशा राज्याच्या सीमेवरील मलकानगिरी भागात नक्षलवाद्यांनी आज (दि.१३) पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला आहे. या जवानावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

 
 
एएनआयच्या ट्विटनुसार, मलकानगिरी भागात नक्षलींनी घडवून आणलेल्या या स्फोटात बीएसएफ जवान जगपाल सिंह जखमी झाले आहेत. त्यांना कोरापुट येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या तुकडीला येथे नक्षलवाद्यांनी निशाणा बनवले आहे.