पित्रोदा, तुम्हाला लाज वाटायला हवी; राहुल गांधी यांनी सुनावले
   दिनांक :13-May-2019
खन्ना, 
1984 च्या शीखसंहाराबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सॅम पित्रोदा यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी. त्यांनी देशाची जाहीरपणे माफी मागायला हवी, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सोमवारी पित्रोदा यांना सुनावले.
 

 
 
राहुल गांधी येथे एका निवडणूक सभेत बोलत होते. सॅम पित्रोदा यांनी शीखसंहाराबद्दल जे काही वक्तव्य केले, ते पूर्णपणे चुकीचेच होते. त्यांना असे बोलणे मुळीच शोभले नाही. असे बोलताना त्यांना लाज वाटायला हवी होती, त्यांना जर खरोखरच या वक्तव्याचे दु:ख वाटत असेल, तर त्यांनी सर्वप्रथम देशाची माफी मागायला हवी. आज मी आपली भूमिका जाहीरपणे विशद केली आहे आणि फोनवरूनही मी त्यांना याच भाषेत बोललो आहो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे देखील उपस्थित होते.