‘सैराट’ आता छोट्या पडद्यावर!
   दिनांक :13-May-2019
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी असो किंवा आर्ची- परश्याचे सुपरहिट डायलॉग्स असो आजही प्रेक्षकांच्या तोंडून सरास ऐकायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले होते. आता या चित्रपटाची हिंदी मालिका येणार आहे. 
 
 
मोठ्या पडदा गाजवल्यानंतर ‘सैराट’ चित्रपटावर आधिरित एक हिंदी मालिका छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे. या मालिकेचे नाव ‘जात ना पूछो प्रेम की’ असे ठेवण्यात आले आहे. तसेच ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतील अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड आर्ची आणि परशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आर्ची-परशाची ही कथा मालिकेत उत्तर प्रदेशमध्ये घडणार आहे.
‘जात ना पूछो प्रेम की’ या मालिकेची घोषणा करत अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी ‘चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी आणि त्यासाठी टीव्ही सर्वांत उत्तम माध्यम आहे’ असे म्हटले. आता चाहते ही मालिका कधी सुरू होणार यासाठी आतुर आहेत.