...म्हणून सलमानने नवाजला पार्टीचे आमंत्रण देणे केले बंद
   दिनांक :13-May-2019
बॉलिवूडमध्ये दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने आतापर्यंत काही निवडक चित्रपटांची निवड केली असून त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले आहेत. त्यामुळे अभिनयाच्या जोरावर त्याने त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. 

 
नवाजुद्दीनने सलमानसह ‘किक’ आणि ‘बरजंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे सलमान आणि नवाज यांच्यामध्ये एक चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. आधी सलमान नवाजला त्याच्या प्रत्येक पार्टीचे आमंत्रण देत असे. पण नंतर सलमानला असे जाणवले की नवाजला कोणत्याही पार्टीचा हिस्सा होणे आवडत नाही. तरीही मैत्री खातीर नवाज पार्टीला येत असल्याचे त्याला समजले. कारण पार्टीमध्ये नावज शांत एका कोपऱ्यात, कोणासोबतही न बोलता बसत असे आणि त्यामुळेच सलमानने नवाजला पार्टीचे आमंत्रण देणे बंद केले असल्याचे नवाजने सांगितले.