माजी नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

    दिनांक :13-May-2019
 पुणे: एमआयएम पक्षातून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलिस ठाण्यात 27 वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मतीन रसीद सय्यद हा अन्य एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.
 
 
 
आई आजारी असल्याचे सांगून एमआयएम नगरसेवकासह दोघांनी पीडित महिलेल्या कारमधून औरंगाबाद येथे नेले. 18 नोव्हेंबर ते 19 फेब्रुवारी या कालावधीत औरंगाबादेत पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी सदर महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून औरंगाबाद येथे राहणार्‍या मतीन रसीद सय्यद आणि हमीद सिद्दिकी मोहसीन रसीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 
त्याचा फायदा घेऊन दुष्कृत्य करण्यात आले. दरम्यान, मतीन रसीद सय्यदवर औरंगाबाद येथे याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल असून, औरंगाबाद कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.