सेरेना विलियम्स रोम स्पर्धेत खेळणार

    दिनांक :13-May-2019
रोम,
 
सेरेना विलियम्स दुखापतीतून सावरली असून, ती पुढील आठवड्यात होणार्‍या रोम स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेत खेळणार असल्याचे सेरेनाने सांगितले.
 
 
 
रोम स्पर्धा ही तिची यंदाच्या मोसमातील चौथी स्पर्धा आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे एप्रिलमध्ये मियामी ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरची पहिलीच स्पर्धा ठरणार आहे. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या सेरेनाने यंदाच्या मोसमात आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ती 23 वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकते का, याची उत्सुकता सध्या लागली आहे. मागील वर्षी बाळंतपणानंतर परत उतरलेल्या सेरेनाला लय गवसली नव्हती. 2017 मध्ये तिने शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. सर्वाधिक स्पर्धा जिंकण्याचा जर्मनीच्या स्टेफी ग्राफचा विक्रम  मोडला आहे. सप्टेंबर 2017 मध्ये मुलीला जन्म दिल्यावर सेरेना फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, ती चौथ्या फेरीतच गारद झाली होती.