गुरुदासपूर येथे सनी देओलच्या वाहनाला अपघात
   दिनांक :13-May-2019
गुरुदासपूर राष्ट्रीय महामार्गावर अभिनेते आणि भाजपाचे उमेदवार सनी देओल यांच्या कारच्या ताफ्यातील तीन कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातातून सनी देओल थोडक्यात बचावले आहेत. सनी देओल ज्या कारमध्ये बसले होते त्या कारचा टायर फुटला आणि समोरून येणाऱ्या गाडीला चुकवताना हा अपघात झाला. दुसऱ्या काही गाड्या या ठिकाणी बोलवून सनी देओल पुढील प्रचारासाठी रवाना झाले आहेत. प्रचारासाठी सनी देओल निघाले असताना चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या कारला टाळताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या गाडीपासून वाचावे म्हणून चालकाने कार वळवली त्यावेळी सनी देओल बसले होते त्या कारला इतर दोन कार आदळल्या. तिन्ही कार्सची एकमेकांमध्ये धडक झाली आणि हा अपघात झाला.
 
 
मात्र सुदैवाने सनी देओल स्वतः आणि त्यांच्यासोबत असलेले सगळेजण या अपघातातून बचावले. अमृतसर येथील नॅशनल हायवेवर असलेल्या सोहल गावाजवळ हा अपघात झाला.