वर्धा : शास्त्री चौकात ३ दुकानांना आग
   दिनांक :13-May-2019
वर्धा : शहरातील शास्त्री चौक परिसरात रात्री उशिरा लागलेल्या आगीत तीन टपऱ्या जळून खाक झाल्या. आग लागल्याचे लक्षात येताच नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगी श्रीवास्तव यांच्या मालकीची टपरी, गॅस वेल्डिंगच्या दुकानातील तसेच अन्य एका दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत तिन्ही छोट्या दुकांदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या तीन दुकानांपैकी एका दुकानातून मोठ्या प्रमानात दारूची अवैध विक्री होत असल्याची ओरड आहे.