दोन खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

    दिनांक :13-May-2019
बर्लिन,
2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील दोन खेळाडूंचे उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी सात वर्षांपूर्वी नमुने घेण्यात आले होते. या चाचणीमध्ये ते दोषी आढळल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केली आहे. या खेळाडूंनी प्रतिबंधित अॅनाबोलिक स्टेरॉईडचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
 
महिलांच्या भारत्तोलन स्पर्धेत सहभागी झालेली अर्मेनियाची महिला भारत्तोलक मेलिन दालुझायन चाचणीमध्ये दोषी आढळली आहे. लॅटिव्हाची लांब उडीपटू इनेटा राडेव्हिका ही देखील उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये दोषी आढळली. तिने ऑक्सान्ड्रोलोन स्टेराईड सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली असून, उत्तेजक द्रव्य सेवन केल्यामुळे संबंधित महासंघांकडून त्यांच्यावर बंदी लादली जाईल.