यामी गौतम साकारणार 'ही' भूमिका
   दिनांक :13-May-2019
अभिनेत्री यामी गौतमने 'उरी' चित्रपटामध्ये साकारलेली गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांना भावली. आता यापुढे ती कोणत्या भूमिकेत दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
 
 
 
 आता ती 'बाला' या तिच्या आगामी चित्रपटामध्ये 'लखनऊ की सुपरमॉडेल'ची भूमिका बजावणार आहे. यापूर्वी अशा प्रकारची भूमिका तिनं कधीच केलेली नाही म्हणे. या चित्रपटात ती आयुषमान खुरानाबरोबर मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. त्यामुळे तिच्या या भूमिकेबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.