मोदी नीच, फटकळ तोंडाचा माणूस; मणिशंकर अय्यर पुन्हा बरळले

    दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीच आणि फटकळ तोंडाचा माणूस आहे. त्यांना मी यापूर्वीही नीच असेच संबोधले होते आणि आजही त्या भूमिकेवर कायम आहे, अशी बडबड काँग्रेसचे वाचाळ नेते मणिशंकर अय्यर यांनी आज मंगळवारी केली. मोदी यांना नीच संबोधण्याचे समर्थन करणारा एक लेखही त्यांनी प्रकाशित केला. 
 
 
‘रायिंझग काश्मीर ॲण्ड द प्रिंट’ यात अय्यर यांचा लेख प्रकाशित करण्यात आला. या लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘आठवा, डिसेंबर 2017 मध्ये मी काय बोललो होतो. मोदी यांना नीच संबोधण्यात मी कोणतीही चूक केली नाही, याची आता मला खात्री पटली आहे.
 
 
 
२०१७ मध्ये मी नरेंद्र मोदी यांना काय म्हटले होते, ते आठवते का, मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती का, असा सवालही त्यांनी या लेखात केला आहे. या लेखात त्यांनी मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
-Advt- 
 
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात अय्यर यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘नीच प्रकारचा माणूस’ असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाने या वक्तव्यावरून अय्यर यांना धारेवर धरत काँग्रेसची कोंडी केली होती. त्यानंतर या वक्तव्यासाठी अय्यर यांना माफी मागावी लागली होती, तसेच काँग्रेसनेही अय्यर यांना पक्षातून निलंबित केले होते.