मी टाईमपास म्हणून प्रेम करत नाही : रकुलप्रीत सिंह
   दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन  
मुंबई,
अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने साउथ इंडस्ट्रीमध्ये ३ वर्षे धमाल केल्यानंतर 'यारिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरही तिने हिंदी चित्रपटांमध्ये साउथच्या चित्रपटांना पसंती दिली. आता ती लवकरच अजय देवगण आणि तब्बू या दिग्गज कलाकारांसोबत 'दे दे प्यार दे'मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
 
 
चित्रपटाबाबत रकुलप्रीत म्हणाली, 'दे दे प्यार दे'ची स्टोरी खूपच इंट्रेस्टिंग आहे. लव रंजन यांची ती खासियतच आहे. त्यांचा विषय हा जरा वेगळाच असतो, पण तो सर्वपरिचत असतो. त्यामुळेच हा विषय सर्वांशी रिलेट असा आहे. आज बदलत्या जीवनशैलीत रिलेशनशिपमधील वय वाढत चालले आहे. भले ही त्याला ह्यूमर असे म्हटले जाते. पण हा चित्रपट खूपच प्रोग्रेसिव्ह आहे. माझ्या मते सध्याच्या परिस्थितीवर त्यावर भाष्य करण्यात आले आहे.
तुझे प्रेमाबद्‌दल काय मत आहे, असे विचारले असता ती म्हणाली, माझा सर्वाधिक विश्‍वास हा प्रेमावर आहे. जीवनात प्रेम हे खूपच महत्त्वाचे आहे. तुम्ही जर योग्य रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचे जीवन आणखीन सुंदर होईल. मला एक ना एक दिवस योग्य जीवनसाथी मिळेल. यासाठी मी कधीही टाइमपास म्हणून प्रेम करत नाही, असे रकुलप्रीतने सांगितले.