मान्सूनचे आगमन ४ जूनला, विदर्भात कमी पाऊस; स्कायमेटचा अंदाज

    दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन  
नवी दिल्ली,
देशभरात सध्या सूर्याचा प्रकोप सुरु आहे. विदर्भावर तर जास्तीच. पारा ४८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रासह विदर्भातील तापमान उंची गाठत असल्याने उन्हामुळे त्रासलेले लोक आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. यावर्षी सर्वात आधी केरळमध्ये पाऊस ४ जून रोजी हजेरी लावेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविला आहे. 

 
 
मात्र मुंबई, महाराष्ट्रात पाऊस लांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही बाब चिंताजनक आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होताहोता पाऊस राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जून ते सप्टेंबदरम्यान किती पाऊस पडेल याबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटने याआधीच जाहीर केला आहे. यंदा सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल असे या हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी पडलेल्या ९७ टक्के पावसाच्या ९३ टक्के हा पाऊस असणार आहे, त्यामुळे यंदा भीषण परिस्थिती ओढवणार असल्याचे दिसत आहे.