अमेरिकेत दोन विमानांची हवेत टक्कर; पाच जणांचा मृत्यू
   दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
अलास्का,
अमेरिकेतील अलास्का या राज्यात दोन विमानांची टक्कर होऊन मोठा अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. वृतसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरात हा अपघात झाला. दोन विमानाची हवेत टक्कर झाली. अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा
 
 
 
अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. ही दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी होती. या दुर्घटनेत एक जण अद्याप बेपत्ता आहे.