हुकूमशाही असलेला सुंदर देश "तुर्कमेनीस्तान"

    दिनांक :14-May-2019
नीलेश जठार
9823218833
 
गभरातील पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश म्हणजे मध्य आशियातील तुर्कमेनीस्तान. उत्तर कोरिया हाही जगापासून असाच तुटलेला देश आहे; पण तुर्कमेनिस्तान इतके आकर्षण त्या देशाला नाही. 1991 मध्ये हा देश सोव्हिएत युनियनचा घटक होता मात्र, आता हा स्वतंत्र देश बनला असला तरीही येथे हुकुमशाही असल्याने देशातील नागरिक खुलेपणाने बोलू शकत नाहीत. इतकेच काय त्यांच्या बोलण्या- फिरण्यावर, फोटोग्राफी करण्यावर बंधने आहेत. येथील नागरिक उगीचच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. 
 
 
मिडीया हा प्रकार या देशात नाहीच. या देशात खासगी वृत्तपत्र वाहिनी नाही किंवा वृत्तपत्रदेखील नाही. सरकारी वाहिन्या आणि सरकारच वृत्तपत्र त्यामुळे त्यात प्रकाशित होणार तेच जे सरकार म्हणेल. इतकी बंधने असली तरी या देशात पर्यटनाच्या दृष्टीने सरकारने जे काम केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. केवळ पर्यटनातूनच अर्थव्यवस्था सुधृढ करणार्‍या देशामध्ये तुर्कमेनीस्तान हे नाव पहिल्या पाचमध्ये येत साधारण प्रत्येक देशाबरोबर या देशाचे चांगले संबंध आहेत आणि या देशाचा टुरिस्ट व्हिसा सहज मिळतो. अर्थात फक्त पर्यटन सोडले तर बाकी कुठल्याही बाबतीत या देशाने कुठलेही व्यवहार बाकी कुठल्याही देशाशी ठेवले नाहीत, हे विशेष. या देशात जे काही चालतं ते केवळ राष्ट्रपतीच!
 
या देशात जागोजागी राष्ट्रपतींची पोस्टर्स आहेत. नागरिकांना कायद्याने अधिकार जवळजवळ नाहीत. मात्र, अनेक सुविधा आहेत. येथील 67 टक्के लोक तुर्किश आहेत आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. या देशाची राजधानी आहे अश्गाबाद. येथे संगमरावरी हवेल्या, कारंजी, सोन्याचे पुतळे, संग्रहालये आणि भुरळ घालणारे बाजार यांची रेलचेल आहे. या वाळवंटी देशात अनेक सुंदर ओॲसीस आहेत. काराकुरामजवळ रशियन संशोधकांच्या चुकीमुळे अजूनही ज्वाला फेकणारे नरकाचे द्वार किंवा गेट ऑफ हेल आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. 

 
 
या गेटची हकीकत अशी की, काही रशियन भूगर्भ शास्त्रज्ञ येथे ड्रिलिंग करत होते तेव्हा नैसर्गिक वायू बाहेर आला. हा वायू विषारी असावा अश्या समजुतीने तो पेटविला गेला. ही आग काही दिवस, काही महिन्यात नक्की विझणार, अशी खात्री दिली गेली होती मात्र, कित्येक वर्षे होऊनही ही आग अजूनही धुमसते आहे.
 
या देशातील लोकांना बॉलीवूडचे भयंकर वेड असून येता जाता कधीही येथे हिंदी गाणी कानावर पडतात. मुलांना त्यामुळे येथे हिंदी भाषेचे शिक्षण दिले जाते. या देशात जाण्यासाठी वसंत आणि हिवाळा हे दिवस चांगले कारण, त्यावेळी तापमान थोडे सुसह्य असते. नरकाचे द्वार मानल्या गेलेल्या क्रेटर जवळ तंबूत मुक्काम टाकून रात्री राहता येते. या देशाची लोकसंख्या 50 लाख असून सोव्हिएत संघातून बाहेर पडताना स्पारमाऊत नियाजोव यांनी सत्ता खेचून घेतली असून देशात हुकुमशाहीचा पाया घातला आहे.
 
येथील नागरिक आता त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. भारतीयांना तुर्कमेनीस्तानचा टुरिस्ट व्हिसा हा 25 दिवसाचा मिळतो त्यात तुम्ही 15 दिवस पाहू शकाल इतकी वेगवेगळी पर्यटन स्थळे या देशात आहेत. भारतापेक्षा या देशाचे चलन काही प्रमाणातच महाग आहे. मात्र, देश तास स्वस्त आहे एक दिवसाचा प्रती माणसाचा खर्च साधारण 2000 इतका येऊ शकतो. शिवाय तुर्कमेनीस्तानला विमान नाही. आपल्याला अफगाणिस्तान वरून रस्ता मार्गानेदेखील या देशात जाता येऊ शकता.