'बिग बॉस १'चे स्पर्धक 'या' मंचावर येणार एकत्र
   दिनांक :14-May-2019
मुंबई,
'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचे हे स्पर्धक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमात ते दिसणार आहेत.
 
'बिग बॉस' मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ज्यांची मैत्री खूप चर्चेत राहिली असे मेघा धडे, सई लोकूर आणि पुष्कर जोग, शर्मिष्ठा राउत आणि नंदकिशोर चौघुले, विनीत भोंडे, स्मिता गोंदकर – सुशांत शेलार, यांचे एकदम कडक परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात बघायला मिळणार आहेत. या विशेष भागाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करणार आहे.