जैशच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक
   दिनांक :14-May-2019
नवी दिल्ली,
 
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. अब्दुल मजीद बाबा असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अब्दुलविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली.
2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून अब्दुल मजीद बाबा हा फरार होता. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच फरार झालेल्या अब्दुल विरोधात उच्च न्यायालयाने वॉरंट जारी केले  होते.