गौतम गंभीरने कोहलीवर साधला निशाणा; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार

    दिनांक :14-May-2019
बई,
 
गौतम गंभीरने पुन्हा एकदा कॅप्टन कोहलीवर निशाणा साधला आहे. कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पण,कर्णधार म्हणून त्याला रोहिल शर्माने तगडे आव्हान उभे केले आहे, असे मत व्यक्त करून त्याने कोहलीचे टेंशन वाढवले आहे.
 
 
यंदाच्या आयपीएलमध्येही कोहलीच्या RCB ला गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले. त्यावरून गंभीरने कोहलीवर टीका केली होती. ''कोहली इतका नशीबवान खेळाडू दुसरा कोणी नसेल. सातत्याने अपयशी ठरूनही RCB ने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेले नाही,'' असा टोमणा त्याने मारला होता. आता रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर गंभीरने पुन्हा कोहलीला धोक्याचा इशारा दिला आहे.
तो म्हणाला," रोहितच्या नावावर चार आयपीएल जेतेपद आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर तीन, परंतु कोहलीच्या नावावर एकही नाही. रोहितने कर्णधार म्हणून स्वत:ला सिध्द केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ कोहलीच्या अनुपस्थितीतील पर्याय म्हणून पाहू नका. रोहितने आता सर्वोच्च शिखर गाठले आहे आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी तो तगडा पर्याय ठरू शकतो. फलंदाज म्हणून विराट ग्रेट आहे, पण कर्णधार म्हणून रोहित वरचढ ठरतो."