नवीन मोदी सरकार जास्तीत जास्त १५ दिवस टिकेल; पवारांची भविष्यवाणी

    दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
मुंबई,
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले तरी ते फारकाळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले.
 
 
 
यावेळी पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपतींनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले तरी या सरकारची अवस्था १९९६ सालच्या वाजपेयी सरकारप्रमाणे होईल. त्यामुळे नवं मोदी सरकार फारतर १३ ते १५ दिवस टिकेल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
 
-Advt-
 
तसेच राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम वेगात सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून येत्या १९ तारखेला अंतिम टप्प्याचे मतदान होईल. यानंतर २३ तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होईल. तेव्हा देशाचा कौल कुणाच्या बाजूने असेल आणि नेमकी परिस्थिती काय असेल याची वाट पाहायला पवार साहेबांना काहीच हरकत नाही.