पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात
   दिनांक :14-May-2019
भारतीय हवाई दलाने चढवलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर आजही पाकिस्तान सावध असून एकीकडे तणाव कमी करण्याचे सोंग रचत महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केलेले आहेत.
 
14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते. नुकतेच तणाव कमी करण्यासाठी हे दल मागे घेतले असले तरीही पाकिस्तानने सीमेवर अद्याप तीन ब्रिगेड ठेवलेली आहेत. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, 125 बख्तरबंद ब्रिगेड आणि 8-15 डिव्हिजन तैनात केलेल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्याला एक स्वतंत्र बख्तरबंद ब्रिगेड साथ देत आहे. या अहवालामध्ये सरकारी सुत्रांचा हवाला देण्यात आला आहे. हे सैन्य आक्रमक हल्ल्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर या सैन्याची तैनाती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.