बारामतीमध्ये जन्मदात्या आईनेच घातला मुलीच्या डोक्यात दगड

    दिनांक :14-May-2019
 
बारामती : जन्मदात्या आईनेच डोक्यात दगड घालून मुलीची हत्या केल्याने बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.  ऋतुजा हरीदास बोभाटे (वय १९) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. स्वतःच्या मुलीची हत्या केल्या नंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे  पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे.
 
 
 
हत्या  झलेल्या मुलीने काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र यानंतर तिचा पती तिला नांदवत नव्हता. तसेच मयत मुलीने तिच्या पतीविरुद्ध तक्रारही पोलीस स्टेशनला दाखल केली होती. यात त्या पतीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुलीने नांदावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चाही केली होती.
मात्र ऋतुजाचा पती नांदवत नसल्याने मुलीचा आणि तिच्या आईचा  घरी रोज वाद होत होता . आज अशाच एका घरगुती कारणाच्या वादातून रागाच्या भरात त्या मुलीच्या आईने डोक्यात दगड घालून आपल्याच मुलीचा निर्घृणपणे खून केला. यानंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली.