मी गरिबांचे दुःख दूर करण्यासाठी जगतो : नरेंद्र मोदी
   दिनांक :14-May-2019
काशी,
 
मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणे  हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केले आहे. मी गरिबांचे दुःख दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
 
 
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिलेचे सरकार 2 जी घोटाळ्यात व्यस्त होती. मात्र आता 4 जी देशातील गरिबांपर्यंत पोहचले आहे. आज जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात केला जातो. पराभवाच्या भितीपोटी महामिलावटी लोकं मला शिव्या देण्याचे काम करत आहेत. मात्र यांच्या शिव्या माझ्यासाठी आर्शीवाद बनला आहे असे त्यांनी सांगितले.
 
मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, स्वत: मतदान करा, इतर लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, पहिल्यांदा मतदान करा आणि जेवण करा. मतदान केल्यानंतर स्वत:चा सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करा आणि दुसऱ्या लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले.
 
 
काशीमधील लोकांना मला सांगितलं इथं येऊ नका, आम्ही सांभाळून घेतो. आज प्रत्येक काशीतील रहिवाशी मोदी बनून निवडणूक लढवत आहे. जनसहभागातून काशी विकासाच्या मार्गावर जात आहे. काशीसोबत जोडल्याने मी धन्य झालो. माझं जीवन काशीच्या कामी आले त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.