सलाह,सॅदियो, पिएरेला; संयुक्तपणे ‘गोल्डन बुट’

    दिनांक :14-May-2019
लिव्हरपूल,
 
लिव्हरपूलचे स्टार आक्रमक खेळाडू मोहम्मद सलाह, सॅदियो माने आणि आर्सेनलचा पिएरे एमरिक औबमायांग या तिघांनाना संयुक्तपणे गोल्डन बुट बहाल करण्यात आला. या या तिन्ही आफ्रिकन आक्रमक खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीत लिव्हरपूलचे व्यवस्थापक जुर्गेन क्लॉप यांचा सिंहाचा वाटा आहे. सेनेगलचा फॉरवर्ड सॅदियो माने याने दोन गोल नोंदवून लिव्हरपूलला वॉल्व्हहॅम्पटनविरुद्ध 2-0 ने विजय मिळवून दिला.
 
 
 
माने व सलाहने 44 गोल नोंदविले, परंतु त्यांचे परिश्रम व्यर्थ ठरले. कारण त्यांचा लिव्हरपूल संघ प्रीमियर लीग विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. मॅन्चेस्टर सिटीने प्रीमियर लीग विजेतेपदाचा मान मिळविला. आर्सेनलच्या पिएरे एमरिकने युरोपा लीगमध्ये व्हॅलेन्सियाविरुद्ध हॅट्‌ट्रिक नोंदविली.