ऊस कापणी, गांठी खुडण्यासाठी श्रम वाचविणारे उपकरण
   दिनांक :15-May-2019
उसासाठी वापरण्यात येणारी सध्याची पद्धत ही श्रमसाध्य, वेळ घेणारी आणि महाग पद्धत आहे. परंतु यात मदत करणारे एक यंत्र म्हणजे ‘उस गाठी खुडे’ असून हे जमिनीवर स्थिरावलेले आहे, त्याला एक अर्धचंद्राकार चाकू असून ते शस्त्रक्रियेद्वारे एक उच्च प्रभावी पद्धतीने उसाची गाठ कापते. यात उसाला काहीही इजा न होता ही गाठ सफाईने कापली जाते. या उपकरणाच्या वापराने एक माणूस एका तासात सुमारे १०० गाठी खुडू शकतो.
  
 
हाताळणी क्षमता : या उपकरणाचा वापर उसाचे लहान तुकडे करण्यासाठी देखील करता येतो. हे वापरण्यास सोपे असून हे उसाचे वेगवेगळे आकार आणि रुंदी हाताळू शकते. पूर्वीच्या परंपरागत पद्धतीमुळे हातांवर आणि अंगठ्यावर बळ द्यावे लागायचे, यात तिरप्या कापणीने उसाची नासधूस देखील जास्त प्रमाणात व्हायची, आणि कडक उसांच्या गाठी खुडण्यास अक्षम ठरायचे.
 
यंत्राचा तपशील
ऊस गाठी खुडे या उपकरणात सरफेस प्लेट, होल्डिंग स्टँड, रेसिप्रोकेिंटग असेंब्ली, एडजेस्टेबल स्क्रूने वरखाली होणारे एक लीव्हर, कनेक्टर, यू आकाराचा कापणीचा चाकू, ज्याला एका स्प्रिंगने बरोबर खाली खाचेत जाऊन कापणी करेल अशा प्रकारे बसविलेले असते. त्याच बरोबर त्याला गोल स्प्रिंग आणि खिळे लावलेले असतात ज्याने कापणी करतांना बळ लावता येते.
 
उपकरणाची किंमत ६०० रु. असून यावर पाच वर्षांची गॅरंटी दिलेली आहे. हे उपकरण वापरणारा माणूस आरामात जमिनीवर बसून काम करू शकतो. डाव्या हाताने एकामागून एक असे ऊस उपकरणाला पुरवून उजव्या हाताने आरामात स्प्रिंग लावलेल्या हँडलच्या सहाय्याने गाठी कापण्याचे काम करू शकतो.