वैशाखी पौर्णिमेला होणार प्राण्यांची गणना

    दिनांक :15-May-2019
82 मचानाची व्यवस्था
 
वर्धा : प्रत्येक वर्षाप्रमणो यावर्षी देखील वैशाखी (बुध्द) पौर्णिमेच्या दिवशी 18 मे रोजी बोर व्याघ्र प्रकल्पासह सगळयाच वनपरिक्षेत्रात प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. प्रत्येक जलस्त्रोता जवळ 82 मचानाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून चांदण्यांच्या प्रकाशात प्राण्याची गणना करण्यात येणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांच्या प्रकाशात सायंकाळी 6 वाजता पासून गणना प्रारंभ होणार आहे. दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता गणना समाप्त होणार आहे. याकरिता 8 वनपरिक्षेत्रात 82 मचानाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणनेत सहभागीहोणा-यांना 15 मे पर्यत क्षेत्र संचालक कार्यालयात आवेदन करावयाचा आहे. यानंतर मचानीचे स्थान वितरण करण्यातयेणार आहे. प्राणी गणनेत 18 ते 60 वर्ष वय असलेले नागरिक सहभागी होऊ शकतात. निवड करण्यात आलेल्या व्यक्ती 18 मे रोजी परिचय पत्रासह उपस्थित राहावे लागणार आहे. एका मचानावर दोन लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच एक गाईड देखील राहणार आहे. उल्लेखनिय असे की यावेळी सहभागी होण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांना केवळ जेवण, पाणी, चटाई व चादरेची व्यवस्था करावी लागणार आहे. टॉर्च, कैमेरा, सर्चलाईन आदी वस्तु सोबत ठेवता येणार नाही. जेवणाचा डब्बा आणण्याकरिता अल्यूमिनियम फाईलचा उपयोग केल्या जावु शकतो, अशी माहिती वनविभागाचे वतीने देण्यात आली आहे. जिल्हयात आठ वन परिक्षेत्रात याकरिता 82 मचानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात खरांगणा वनपरिक्षेत्रात 14, वर्धेत 5, समुद्रपूर मध्ये 8, हिंगणी 10, आर्वी 15, कारंजा 9, आष्टी 15, व तळेगाव शामजीपंत वनपरिक्षेत्रात 8 मचानाची व्यवस्था करण्यात
आली आहे.
 

 
 
बोर प्रकल्पात वाघाचे वास्तव्य
बोर व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. वाघासाठी हा प्रकल्प देशभरात ओळखल्या जातो. बोर प्रकल्पाच्या बफर झोन
मध्ये वाघाची संख्या अधिक आहे. प्रत्येक बौध्द पौर्णिमेला होणा-या गणने दरम्यान वाघाच्या संख्येत वाढ झाली की नाही, हे
पाहले जाते. अन्यथा होणार कार्रवाई प्रगणनेन सहभागी होणा-या प्रगणकास 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यत स्वयंखर्चाने त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचणे आहे. एका मचानीवर एक किंवा दोन प्रगणक व एक वनविभागाचा कर्मचारी राहणार आहे. त्यांना नियमावलीचा एक तक्ता देण्यात येणार आहे. यात जलस्त्रोतावर चोवीस तासात किती वन्यप्राणी दिसले याची माहिती भरावी लागणार आहे. प्राणी गणणेत सहभागी होणा-यांना आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वत:चकरावी लागणार आहे. प्राणी गणनेच्या वेळी एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येईल.