काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला

    दिनांक :15-May-2019
नवी दिल्ली,
 प. बंगालसह उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ माजली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे.

 
आदिती सिंह यांनी सांगितले की, लखनऊ त्या निघाल्या असताना जवळपास 40 ते 50 लोकं त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. आदिती सिंह या गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या आहेत. आदिती सिंह यांची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी भेट घेण्याची शक्यता आहे.
 
 
देशातील प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मंगळवारी जिल्हा पंचायत अध्यक्ष अवधेश सिंह यांच्याविरोधात अविश्वास ठराव समंत होणार होता. मात्र त्याआधीच काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला. अवधेश सिंह हे रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले दिनेशप्रताप सिंह यांचे बंधू आहेत. आदितीने अवधेश सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप लावला आहे.