आजचे राशी भविष्य, दि. १५ मे २०१९

    दिनांक :15-May-2019

 

मेष- नव्या कामांचा विचार कराल. काही कामं पूर्णत्वास जातील. संपत्तीच्या कामांवर लक्ष द्या. आजचा दिवस कुटुंब, खासगी आयुष्य आणि आर्थिक व्यवहार यातच व्यतीत होणार आहे. काही महत्त्वाच्या कामांचा वेत आखाल. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर लक्ष द्या. मित्र आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

 

वृषभ- कोणा एका नकारात्मक प्रसंगात अडकलात तर, महत्त्वाची भूमिका निभावाल. आज कोणताच निर्णय घेऊ नका, निष्कर्षही काढू नका. सावध राहा. विचारपूर्वकपणे बोला. इतरांकडे लक्ष द्या. साथीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

 

मिथुन- अडचणींशी दोन हात करण्यासाठीची हीच वेळ योग्य आहे. विचाराधीन असणारी कामं पूर्ण करा. दैनंदिन कामं पूर्ण होतील. अडचणी लवकरच दूर होतील.

 

कर्क- प्रेमसंबंधांमध्ये गैरसमजुतींना वाव मिळेल. कोणत्याच बाबतीत बेजबाबदार राहू नका. नोकरी आणि व्यापारातही बेजबाबदारपणा नको. विचाराधीन असणारी कामं पूर्ण होण्यास दिरंगाई होऊ शकते. कोणत्याही कामात आज जास्त मेहनत घ्यावी लागेल.

 

सिंह- अनेक विचारांमध्ये गुंतलेले असाल. पैसे सांभाळा. देवाण- घेवाणीच्या व्यवहारांमध्ये विचार करा. मनात अनेक विचार असतील. कटूपणे कोणाशीही बोलू नका. आज कोणतेही बेत आखू नका. जुनी कामं पूर्णत्वास न्या. प्रकृतीची काळजी घ्या.

 

कन्या- व्यापाराच्या बाबतीत विचार करा. साथीदाराकडून सहकार्य आणि सुख मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला असेल. विचाराधीन असणारी कामं पूर्ण करा. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट घडेल. स्वत:च्या कामांवर लक्ष द्या. धीर बाळगा. मन प्रसन्न असेल.

 

तुळ- दिवस चांगला आहेच. परिस्थितीचा फायदा घेऊन कामं पूर्ण करा. आज काही चांगल्या संधी मिळतील. त्यांचं सोनं करा. दिवस चांगला आहे. आरोग्य चांगलं असेल.

 

वृश्चिक- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. अडचणी निर्माण करणारे अनेकजण तुमच्या आजूबाजूला असतील.

 

धनू- आर्थिक व्यवहार सुधारा. दाम्पत्य जीवन सुखदायी असेल. दैनंदिन कामांपासून धनलाभ होऊ शकतो. कर्ज घेण्याचा विचार कराल. अडचणी दूर होतील. नव्या लोकांची भेट घेण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

 

मकर- दिवसभर सावधच राहा. स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यापुढे अनेक मंडळी अडचणी उभ्या करतील. द्विधा मनस्थितीत गुंतलेले असाल. कामात मन लागणार नाही. आरोग्य चांगलं राहिल.

 

कुंभ- कामाच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. पदाचा फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर जातील. आखलेले बेत यशस्वी होतील. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज चांगला दिवस आहे.

 

मीन- व्यापाराच्या बाबतीत काहीतरी नवं करण्याच्या उद्देशाने अडचणी वाढतील. मनात चाललेल्या कोलाहलामुळे कामात मन लागणार नाही. धोका पत्करू नका. कोणा एका कामाचे परिणाम दिसले नाहीत तर निराश होऊ नका.