टिप्परखाली चिरडून दोन बहिणींचा करूण अंत

    दिनांक :15-May-2019
तीन अपघातात चौघे ठार
नागपूर: दूध घेऊन घरी जात असताना  मागून अतिशय वेगात आलेल्या टिप्परचालकाने त्यांना धडक दिल्याने दोघींचाही टिप्परखाली चिरडून करूण अंत झाल्याची हृदयदायक घटना कळमना हद्दीत पारडी चौकातील हनुमान मंदिरासमोर घडली. अन्य दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला.
लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) आणि आचल रमाशंकर शाहू (१९) रा. जयदुर्गा शंकर किराणाजवळ, बीडगाव रोड असे दोन्ही बहिणींची नावे आहेत.
लक्ष्मी आणि आचल यांना आईवडिल आणि लहान भाऊ आहे. लक्ष्मीने बारावीनंतर शिक्षण सोडले होते. आचल ही बीए द्वितीय वर्षाला होती. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास दोघ्याही एमएच ४९ एझेड ९३३१ क्रमांकाच्या अ‍ॅक्टीवाने पारडी चौकात दूध घेण्यासाठी आल्या होत्या. दूध घेऊन घरी जात असताना भंडाèयाकडून रेती भरून आलेल्या एमएच ४० एके १००८ क्रमांकाच्या टिप्परचालकाने त्यांना मागाहून धडक दिली. त्यात दोघीही टिप्परच्या मागील चाकात सापडून घटनास्थळीच ठार झाल्या. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी लोकांचा जमाव सुरू होताच भितीपोटी टिप्परचालकाने घटनास्थळी ट्रक सोडून पळ काढला. याप्रकरणी रमाशंकर शाहू यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
 

 
 
 
बँकेचा सुरक्षा रक्षक ठार
ड्युटीवर जाण्यासाठी निघालेल्या एका सुरक्षा रक्षकाला बुलेटस्वाराने धडक दिल्याने सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अजय भगवानदास पाजरे (४५) रा. रामबाग असे मृतकाचे नाव आहे.
 मंगळवारी रात्री ८.१५ च्या सुमारास ते एमएच ४९ एपी ९०१९ क्रमांकाच्या मोपेडने ड्युटीवर जात होते. सोबत त्यांची मुलगी इशिका होती. वडिलांना ड्युटीवर सोडून इशिका दुचाकी घेऊन घरी परत जाणार होती. सक्करदरा उड्डाण पुलावरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ००५० क्रमांकाच्या बुलेटस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात पाजरे हे गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत त्यांना मेडिकलमध्ये भरती केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बुलेटस्वार देखील जखमी झाला. त्याला खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी बुलेटस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
तरुणाचा मृत्यू
वेगात असलेल्या दुचाकीची समोर जाणाèया दुचाकीला धडक दिल्याने सूरज धनराज काळे (२५) रा. वर्धा या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
२३ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सूरज काळे आणि आकाश बेनीलाल पवार (२२) हे एमएच ४० बीयू ३७७३ क्रमांकाच्या हिरो होंडा दुचाकीने जात होते. qहगणा हद्दीतील देवळी ते पेंढरी रोडने जात असताना आरोपी आकाशने आपले वाहन वेगात चालवून समोर जाणाèया एमएच ४० एजे ०६९२ क्रमांकाच्या डिस्कव्हर दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन सूरज जागीच मृत झाला. सुरूवातीला हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु, तपासात आकाशच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.