... अन्‌ कॅन्सरपीडित मुलाच्या घरासमोर हॅमिल्टनची कार

    दिनांक :15-May-2019
लंडन, 
लेविस हॅमिल्टनला स्पॅनिश ग्रॅण्ड प्रिक्स फॉम्युला-वन रेस जिंकण्याची प्रेरणा ज्या मुलाकडून मिळाली, त्या कॅन्सरपीडित मुलाला मर्सिडीज टिमने एक फॉर्म्युला वन कार भेट म्हणून त्याच्या घरी पाठविली. बार्सिलोनात जिंकलेल्या या रेसचे विजेतेपद हॅमिल्टनने कॅन्सरपीडित हॅरी शॉ याला समर्पित केले आहे. पाच वर्षीय हॅरी हा सरे येथे रहिवासी असून तो हाडांच्या दुर्मिळ आजाराशी संघर्ष करत आहे.
 
 
 
हॅमिल्टनच्या मर्सिडीज चमूने फॉर्म्युला वन कार्स मधील एक कार हॅरीच्या घरासमोर पार्क करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर हॅरी आपल्या वडिलांच्या कडेवर बसला व त्याने घराबाहेर उभी असलेली हॅमिल्टनची कार बघितली. ही कार बघण्याच्या निमित्ताने हॅरी गत तीन आठवड्यांनंतर प्रथमच घराबाहेर निघाला होता. नंतर हॅरीच्या हस्ते हॅमिल्टनला विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. नंतर हॅमिल्टनने सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅरी शॉला सहकार्य करण्याचे आवाहन करणारा व्हीडिओ संदेश पाठविला.
लेविसने हॅरीसाठी रेस जिंकली, ही फार मोठी गोष्ट झाली, याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि नंतर त्याने हे विजेतेपद हॅरीला समर्पितसुद्धा केले, असे हॅरीचे वडील जेम्स शॉ यांनी सांगितले. मर्सिडीज चमूने या अंधकारमय प्रसंगी आमच्या घरी एक सुखाचा क्षण आणला. या क्षणामुळे आम्हा सर्वांना फार मोठे मानसिक बळ मिळाले. हॅरीच्या चेहर्‍यावरही हास्य उमलले, असे ते म्हणाले.