इंटर मिलान पुन्हा तिसर्‍या स्थानावर

    दिनांक :15-May-2019
मिलान,
 
मॅतिओ पॉलिटॅनो आणि इव्हान पेरीसिक यांच्या शानदार गोलच्या जोरावर इंटर मिलानने चिव्हो संघावर 2-0 ने विजय नोंदविला. या विजयाबरोबरच इंटर मिलान संघाने सीरिज ए फुटबॉल स्पर्धेत पुन्हा तिसरे स्थान प्राप्त केले.
 
 
अटलांटा आणि एसी मिलान यांच्यापाठोपाठ इंटर मिलानने 66 गुणांसह तिसरे स्थान मिळविले असून अजून त्यांना दोन सामने खेळावयाचे आहे. एएस रोमा तीन गुणांनी मागे असून ते अव्वल चार संघात आणि चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहे.