करिना-इरफान जोडी 'या' चित्रपटातून झळकणार

    दिनांक :15-May-2019
एखाद्या चांगल्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही संधी असते. करिना कपूरने आलेल्या संधीला जाऊ दिले नाही. आगामी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटामध्ये ती दिसणार असून, या चित्रपटाला होकार देण्याचे तिचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे चित्रपटचा हिरो इरफान खान.
 
 
इरफानसोबत काम करताना खूप काही शिकायलाही मिळेल या विचारातून तिने झटकन होकार दिला म्हणे. कारकिर्दीतली ही मोठी संधी आहे असे तिला वाटतंय.