मोदींनी उद्योगक्षेत्रात पारदर्शकता आणली : राजीव कुमार

    दिनांक :15-May-2019
 मुंबई: मागील पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातील उद्योगातील वातावरण आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या पदविदान समारंभात ते बोलत होते. यापूर्वी ओळखीच्या लोकांना झुकते माप दिले जात होते. मोठे उद्योग छोट्या उद्योगांना काम करू देत नव्हते. मात्र, आता सर्व क्षेत्रात कें द्र सरकारने पारदर्शकता आणली असून, एकू णच उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, लहान उद्योग आणि नव्या उद्योगांनाही काम करता येणार असून, सध्याचे सरकार उद्योगांसाठी योग्य वातावरण निर्माण करीत आहे. त्याचबरोबर स्वत:ची जबाबदारीही पुरेशा उत्तरदायित्वाने पार पाडत आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळत आहे. याअगोदर अशाप्रकारचे वातावरण देशातील उद्योगक्षेत्रात नव्हते, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
गेल्या पाच वर्षांत भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. भारताचा विकासदर सात टक्क्यांनी पुढे आहे. हा विकासदर कें द्र सरकारने आपली तूट 3.5 टक्क्यांच्या आत ठेवून साध्य केला आहे. त्याचबरोबर चालू खात्यावरील तूटही कधीही 2.5 टक्क्यांवर गेली नाही. याअगोदर विकासदर वाढला तर तूट वाढत असे. गेल्या पाच वर्षांत महागाई कमालीच्या कमी पातळीवर आहे. केंद्र सरकारने अतिशय गुंतागुंतीचा जीएसटी बरीच टीका सहन करून अंमलात आणला आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षांत भारताचा विकासदर आठ टक्क्यांपुढे जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील तरुणांनी नोकरीकें द्री विचार न करता छोटे-मोठे उद्योग सुरू करण्याच्या शक्यतेवर भर द्यावा. ज्या देशात जास्त उद्योग असतात त्या देशात समृद्धी वाढते. उद्योग वाढले नाहीत तर भारत मध्यम उत्पन्न गटाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मात्र, उद्योग आणि सरकारदरम्यानचा समन्वय वाढल्याने कें द्र सरकार उद्योगाच्या मागण्यांचा तातडीने निर्णय घेत आहे. बरेच निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले आहेत. या सर्वांमुळे भारतातील उद्योग सुलभता निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची दखल जागतिक बँकेनेही घेतली असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.