टेनिसपटू निकोल गिब्स, फ्रेंच ओपनला मुकणार

    दिनांक :15-May-2019
न्यू यॉर्क, 
 
अमेरिकेची 26 वर्षीय निकोल गिब्सला आगामी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला मुकावे लागणार आहे. अलिकडेच रोगनिदानात तिला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले आहे. लस ग्रंथी कर्करोगाच्या उपचारासाठी मला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यामुळे फ्रेंच  ओपन खेळू शकणार नाही,असे निकोल म्हणाली.
 
 
जागतिक क्रमवारीत 116 व्या क्रमांकावर असलेली 26 वर्षीय निकोल म्हणाली की, जून महिन्यात विम्बल्डन ओपनची पात्रता गाठण्याचे माझे लक्ष्य आहे. निकोलने 2014 मध्ये अमेरिकन ओपन व 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसर्‍या फेरीपर्यंत मजल मारली होती.