गिरीप्रेमीने रचला इतिहास, माऊंट कांचनजुंगावर फडकावला तिरंगा

    दिनांक :15-May-2019
पुणे,
 
गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. या मोहीमेदरम्यान गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांसह 30 आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांनी माऊंट कांचनजुंगावर चढाई केली. आज (15 मे) सकाळी दहाच्या सुमारास गिर्यारोहकांनी शिखर सर केले. कांचनजुंगा इको इक्स्पेडिशन 2019 ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम आहे. एकाच दिवशी ३० गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर चढाई करणे  हा नवा विक्रम आहे.
 

 
गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी 2012 मध्ये माऊंट एव्हरेस्ट, 2013 मध्ये माऊंट ल्होत्से, 2014 मध्ये माऊंट मकालू, 2016 मध्ये माऊंट धौलागिरी आणि माऊंट च्यो ओयु आणि 2017 मध्ये माऊंट मनास्लुवर मोहीम फत्ते केली होती. अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते आहेत.
आंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व आणि संयोजन झिरपे यांनी केलं. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखराची चढाई केली.
ज्येष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनीही उमेश झिरपे यांच्या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली होती.