सलमानच्या 'भारत'ला 'या' चित्रपटाची टक्कर

    दिनांक :15-May-2019
सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. तूर्तास सोशल मीडियावर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, टीजर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातलाय. पण याचदरम्यान ‘भारत’च्या प्रदर्शनादरम्यान एक मोठी अडचण समोर येऊन उभी ठाकलीय. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या ‘भारत’ समोर ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ या हॉलिवूडपटाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
 
 
 
‘भारत’ आणि ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे येत्या ५ जूनला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. अशात कमाईच्या बाबतीत सुरुवातीचे तीन दिवस ‘भारत’साठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. भाईजानच्या चित्रपटाने प्रदर्शनासोबत बॉक्स ऑफिसवर कब्जा मिळवला तर बरे. पण यदाकदाचित या चित्रपटाचीही ‘रेस 3’ आणि ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’सारखी स्थिती झाली तर ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’पुढे भाईजानच्या चित्रपटाचा टीकाव लागणे कठीण मानले जात आहे.