'एखाद्याचा खून केल्याने कुणी दहशतवादी होत नाही'

    दिनांक :15-May-2019
एखाद्याचा खून केल्याने कुणी दहशतवादी होत नाही असे म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमल हासन यांचा निषेध केला आहे. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे विधान अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले होते. या विधानावरून मोठे वादंग उठले आहे.
 
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन यांच्या वक्तव्याचे समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले, ‘जेव्हापासून भाजपा सत्तेत आहे तेव्हापासून गोडसेचे समर्थन सुरू आहे.’ यावर प्रत्युत्तर देत शरद पोंक्षे म्हणाले, ‘नथुराम गोडसे हे नाटक काँग्रेस सत्तेत असताना आले. भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असताना नाटकावर बंदी आणली होती. मग आता असे म्हणायचे का की काँग्रेसने नथुराम गोडसेला पाठिंबा दिला?’
 
‘दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे. एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही,’ असंदेखील पोंक्षे म्हणाले.