'हा' अभिनेता स्वतःला म्हणवतो, गरीबांचा हृतिक रोशन
   दिनांक :15-May-2019
२९ वर्षीय टायगर श्रॉफ बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनचा खूप मोठा चाहता आहे.  टायगर लवकरच हृतिक रोशनसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकताच टायगरचा स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सध्या टायगर खूप खूश आहे.
 
'स्टुडंट ऑफ द ईयर २'ला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे टायगर श्रॉफ खूप खूश असून त्याने सांगितले की, 'यामुळे मी खूप खूश आहे. ज्यांनी आम्हाला इतके प्रेम दिले, त्यांचे मी आभार मानतो. ' या चित्रपटानंतर टायगर सिद्धार्थ आनंद यांच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे आणि या चित्रपटात टायगरसोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 

 
हृतिक सोबत काम करण्याबाबत टायगर सांगतो की, 'हृतिक रोशन माझ्यासाठी आदर्श आहे. या चित्रपटातील जास्त गोष्टी तर डान्सवर आधारीत आहे. सध्या त्यांच्यामुळे माझ्या मनावर खूप दडपण आहे. माझा पुढचा सिनेमा माझ्यासाठी खूप मोठे चॅलेंज आहे कारण मी माझ्या हिरोसोबत काम करणार आहे. मी स्वतःला गरीबांचा हृतिक रोशन म्हणतो. माझ्यासाठी ही गर्वाची बाब आहे की मी त्यांच्यासमोर उभा राहतो. सध्या आम्हाला डान्स ऑफ शूट करायचे आहे आणि त्याबाबत मी खूप उत्साहीत आहे.'