पश्चिम बंगालमध्ये जे घडले ते लोकशाहीसाठी दुर्देवी : शिवसेना

    दिनांक :15-May-2019
मुंबई,
 
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर  भाष्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये जे घडले ते लोकशाहीसाठी दुर्दैव असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. 
 
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमधील हिंसाचार अतिशय दुख:द घटना आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोड शो करत असताना काही जणांनी हिंसाचार केला, तोडफोड केली. जाळपोळीची घटना घडली हे लोकशाहीसाठी दुदैव आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष राज्यात येत असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तेथील सरकारची असते. मात्र त्या सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्या असे राऊत यांनी सांगितले.