कुलदीप आणि माझ्या यशामध्ये धोनीचे मोलाचे योगदान : चहल

    दिनांक :15-May-2019
कुलदीप यादवच्या आणि माझ्या यशामध्ये धोनीचे मोलाचे योगदान असल्याची प्रतिक्रिया भारताचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने दिली आहे. एका वेबसाईटशी बोलताना चहलने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संघातील इतर दिग्गज खेळाडूंविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
 
 
“कुलदीप यादव आणि माझ्या उत्तम कामगीरीमागे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे योगदान आहे. सुरवातीला आम्ही दोघेही इतर फिरकी गोलंदाजांप्रमाणेच फक्त धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी करायचो परंतु धोनीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावला. आमची विकेट्स घेण्याची भूक वाढली. आम्ही प्रत्येक चेंडू विकेट्स मिळवण्याच्याच उद्देशाने टाकू लागलो.” असे मत यजुवेंद्र चहलने वक्त केले.
चहलने या मुलाखतीत आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय धोनीला दिले. आपण अनिल कुंबळे, शेन वॉर्न, मुथैया मुरलीधरन, ग्रॅम स्वान यांसारख्या अनेक महान गोलंदाजांना सांघिक कामगिरीने बळी घेताना पाहिले आहे. “धोनीने मला व कुलदीप यादवला जोडी बनून गोलंदाजी करण्यास प्रोत्साहीत केले परिणामी आम्ही एकमेकांना अनुकूल अशी गोलंदाजी करू लागलो. यामुळे आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक विकेट्स मिळू लागल्या. आम्ही भारतीय संघाच्या विजयी समीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजाऊ लागलो. धोनी व्यक्तिरीक्त विराट कोहली, रोहित शर्मा व रविंद्र जडेच्या यांच्याही अनुभवाचा आम्हाला वेळो वेळी फायदा होतो.” असे मत चहलने व्यक्त केले.