ममता बॅनर्जींवर मीम; शाझिया इल्मी म्हणतात, तुला तुरुंगात जायचं आहे का?

    दिनांक :16-May-2019
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल पश्चिम बंगालमधील भाजपाच्या युवा मोर्चाच्या नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी ममता बॅनर्जींवरील मीम ट्विटरवर रिट्विट केले आहे. यात ममता बॅनर्जींना हिटलरच्या वेषात दाखवण्यात आले असून हे ट्विट करणाऱ्या युजरला शाझिया इल्मी यांनी ‘तुला तुरुंगात जायचे आहे ?’, असा प्रश्न विचारत ममतादीदींवर निशाणा साधला आहे.
 

 
ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या प्रियंका शर्मा यांना अटक केली होती.  आता भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी ट्विटरवर ममता बॅनर्जींसंदर्भात एक मीम रिट्विट केले आहे. भाजपा कार्यकर्ता विकास पांडे याने हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ममता बॅनर्जींना हिटलरच्या वेषात दाखवण्यात आले आहे. शाझिया इल्मी यांनी मीम रिट्विट करत ‘विकास तुला तुरुंगात जायचं आहे का ?’, असा प्रश्न विचारला आहे.