राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत?

    दिनांक :16-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
नवी दिल्ली,
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधानपदाच्या चर्चांना जोर पकडला आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद मिळाले नाही तरी चालेल, पण भाजपा आणि रालोआला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असे आझाद यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची इच्छा सोडली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
आझाद पुढे म्हणाले, काँग्रेस पार्टीला बहुमत मिळाले तर आम्ही केंद्रात सत्ता स्थापन करू, असे आम्ही याआधीच स्पष्ट केले आहे. परंतु, भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला सत्तेपासून दूर ठेवायचे हेच आमचे लक्ष्य आहे.
 
 
 
आम्हाला सर्वानुमते घेतलेला निर्णय मान्य असेल, असे त्यांनी सांगितले आहे. गुलाम नबी आझाद यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस भाजपाला रोखण्यासाठी पंतप्रधानपद सोडण्यासाठी तयार आहे, असे संकेत मिळत आहे. यावरून काँग्रेस ही निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर फक्त भाजपाला रोखण्यासाठी लढत असल्याचा संदेश लोकांपर्यंत जात असल्याचे स्पष्ट होते.