शौर्याला अनोखी मानवंदना; अभिनंदन यांचा नवीन बॅज तुम्ही पाहिलातं का...

    दिनांक :16-May-2019
नवी दिल्ली,
पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यामुळे त्यांच्या युनिटला नवी ओळख मिळाली आहे. 51 व्या स्कॉड्रनमधल्या बायसन जेट्सच्या पायलट्सनी त्यांच्या जी-सूटवर (गणवेश) फाल्कन स्लेअर असा बॅच लावला आहे. आता या युनिटला याच नावाने ओळखले जाईल. 

 
अभिनंदन यांच्या युनिटमधील पायलट्सनी त्यांच्या गणवेशावर नवा बॅच लावला आहे. यावर फाल्कन स्लेअर लिहिण्यात आले आहे. भारतीय लढाऊ सुखोई एम के आय विमान पाकिस्तानच्या एफ-16ला पाडत असल्याचे चित्र या बॅचवर आहे. यासोबतच अभिनंदन यांचे युनिट स्वत:ला अभिमानाने 'ॲमराम डॉजर्स' म्हणवून घेतं.
 
 
 
अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 मधून डागण्यात आलेल्या 4 ते 5 ॲमराम क्षेपणास्त्रांपासून स्वत:चा बचाव केला होता. त्यामुळेच त्यांचं युनिट 'ॲमराम डॉजर्स' म्हणवून घेतं.